• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री ‘श्वेता खरात’चं ‘झिम्माड’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

'ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'झिम्माड' हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 4, 2023
in मनोरंजन
अभिनेत्री श्वेता खरात

अभिनेत्री श्वेता खरात

मुंबई, 4 ऑगस्ट : रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी ‘ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘झिम्माड’ हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात ‘मन झालं बाजिंद’ फेम ‘श्वेता खरात’ने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे.‌ श्वेता सोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका ‘स्नेहा महाडीक’ हीने हे गाणं गायिले असून या गाण्याचे संगीतकार ‘संगम भगत’ हे आहेत. तर हे गाणं मनाली घरात हिने लिहीले आहे. ‘झिम्माड’ गाण्याचे दिग्दर्शन ‘अक्षय पाटील’ यांनी केले आहे. तर या गाण्याच्या निर्मात्या ‘काजल हिवाळे’ या आहेत.

 

अभिनेत्री श्वेता खरात झिम्माड या गाण्याविषयी सांगते की, जेव्हा पहिल्यांदा अक्षयने मला हे गाणं ऐकवलं त्याक्षणी मी गाण्याच्या प्रेमात पडले. मी या गाण्यासाठी लगेच होकार दिला. हे गाणं चिपळूणमध्ये चित्रीत झालं आहे. गाण्यातील लोकेशन्स डोळ्यांचं पारणं फिटवणारे आहेत. टिम फार कमाल होती. गाणं चित्रित करताना खूप धमाल आली. तुम्ही विश्वास ठेवणारं नाही. पण कुठेही धावपळ न होता, या गाण्याचं चित्रीकरण एका दिवसात पार पडले आहे.

 

पुढे ती एका चित्रीकरणाचा किस्सा सांगितला की, “आम्ही एका धबधब्यापाशी गाण्याचं शूट करत होतो. आणि तो अक्राळविक्राळ धबधबा डोंगराच्या कपारीत होता. जिथे माणसांची वर्दळ नव्हती. खूपचं मोठा धबधबा होता तो. मी सुरूवातीला तिथे जाण्यासाठी घाबरत होते. पण टिमने माझी संपूर्ण काळजी घेतली. माझ्यासोबत गाण्यात एक ज्येष्ठा नावाची लहान मुलगी काम करतेय ती सुद्धा माझ्यासोबत शूटिंग लोकेशनवर आली होती. आम्हाला गाण्याच्या लीरीक्सवर नृत्य करायचं होतं पण, धबधब्याचा आवाज इतका मोठा होता की गाणंच ऐकू येतं नव्हतं. तेव्हा संगीतकार संगम भगतने आमच्यासाठी तिथे गाणं गायलं. आणि आम्ही दोघींनी नृत्य केलं. दरम्यान, हे गाणं फार कमाल झाले आहे, तुम्ही नक्की हे गाणं बघा आणि या गाण्याला भरभरून प्रेम द्या, असे आवाहनही तिने केले आहे.

 

या गाण्याचे दिग्दर्शक अक्षय पाटील गाण्याविषयी सांगितले की, “मी गेली ५ वर्ष संगीतक्षेत्रात काम करीत आहे. आत्तापर्यंत मी बरेचसे म्युझिक अल्बम केले आहेत. साजणी, गोजिरी, मन माझे, माझी पंढरी, चांदण रातीला, दर्या राजा या गाण्यांचे मी दिग्दर्शन केले आहे. आणि आता झिम्माड हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं चित्रीकरण आम्ही चिपळूण येथे केलं आहे. आम्ही चित्रीकरणाचे लोकेशन्स शोधले आणि ते अतिशय निसर्गरम्य होते. आम्ही जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून या गाण्यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुढे ते म्हणाले की, “अभिनेत्री श्वेता खरातने अप्रतिम असं काम या गाण्यात केलं आहे. सेटवर सर्वात जास्त उत्साही जर कोण असेल तर ती श्वेता होती. अभिनेत्री ‘श्वेता खरात’ आणि गायिका ‘स्नेहा महाडीक’ यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम केलं आहे. दोघीही फार मेहनती आहेत. आणि या गाण्यात दोघींनी इतकं अप्रतिम काम केलं आहे. की तुम्ही हे गाणं वारंवार पाहालं याची मला खात्री आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप छान रिस्पॉन्स मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: actress sweta kharatsweta kharatzimmad song

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page