• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

इतिहासात असं पहिल्यांदाच घडणार, महाराष्ट्र विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याविना, नागपूर अधिवेशन गाजणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 7, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
This will happen for the first time in history, both houses of Maharashtra Legislative Assembly will be held without the Leader of the Opposition, Nagpur session will be held

इतिहासात असं पहिल्यांदाच घडणार, महाराष्ट्र विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याविना, नागपूर अधिवेशन गाजणार (संग्रहित फोटो)

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नागपूर, 7 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे उद्या 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच 14 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकाच आठवड्याचे हे अधिवेशन होत असून आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहे हे विरोधी पक्षनेत्यांविना दिसणार आहेत. यावर सरकार शांत असून दुसरीकडे मात्र, विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या आणि विरोधी पक्षनेता न निवडणाऱ्या सरकारच्या चहापानासाठी का जावे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर घटनेत तरतूद असतानाही विरोधी पक्षनेतेपद का दिले जात नाही, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला.

सरकारच्या कथनी आणि करनीत फरक आहे, मग चहापानाला का जावं? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी विचारला आहे. तसेच सरकारमध्ये सौहार्द, सज्जनता नाही. विरोधी पक्षनेता निवडीवर सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला.

याआधी विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेता होते. मात्र, गेल्या सत्रात त्यांचा कार्यकाळ संपल्याने विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेता नाही. तर यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेता निवडण्याची शक्यता धूसर दिसत आहे. त्याचे कारण विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता निवडीवर निर्णय होणार नसल्याची शक्यता आहे.

विधिमंडळात विरोधी पक्षनेता का नाही?

मागच्या वर्षी 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकाही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा जिंकता आल्या नाहीत. एकूण 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एका पक्षाकडे किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे. मात्र, विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे किमान 29 आमदार नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. तर दुसरीकडे विधानपरिषदेत 78 पैकी काँग्रेसकडे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 5 आमदार आहेत. त्यामुळे 10 टक्क्याच्या नियमानुसार काँग्रेसला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. एकंदरीतच राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचाराचा मुद्दा, राज्यावरील कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीचा मुद्दा, बेरोजगारी, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra legislaturenagpurnagpur adhiveshannagpur adhiveshan 2025nagpur adhiveshan newsnagpur winter sessionnagpur winter session 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page