• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!, सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळणार, पणनमंत्री जयकुमार रावल यांची महत्त्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Important news for farmers! Soybean and cotton will get guaranteed price, important information from Marketing Minister Jayakumar Rawal

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!, सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळणार, पणनमंत्री जयकुमार रावल यांची महत्त्वाची माहिती

नागपूर, 12 डिसेंबर : नाफेडच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये 19 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट असून हमीभावाने कापसाची खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.

नाफेड, सीसीआयची हमीभाव केंद्र सुरु करणे व शेतमालाला व कापसाला हमीभाव मिळणेबाबत आमदार संतोष दानवे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते.

पणन मंत्री रावल म्हणाले की, गेल्या वर्षी 11.25 लाख टन सोयाबीन खरेदी केल्यानंतर यंदा 19 लाख टन खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पूर्ण खरेदी प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिजिटल व बायोमेट्रिक पद्धतीने केली जाते. बारदानाच्या कमतरतेचा प्रश्न येऊ नये म्हणून नाफेड व एनसीसीएफ ला 120 कोटींचे आगाऊ देयक दिले असून राज्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. कापूस खरेदीबाबत मागील हंगामात 10,714 कोटी रुपयांची खरेदी झाल्याची नोंद आहे. यंदा 168 खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली असून 156 केंद्रे कार्यरत आहेत. केंद्राच्या निकषांनुसार खरेदी सुरू असून मुख्यमंत्री यांनी अलिकडेच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी चर्चा केली, असेही पणन मंत्री रावल यांनी सांगितले.

सध्या एफएक्यू दर्जाच्या कापसाची खरेदी 5,328 रुपये हमीभावाने सुरू आहे. मागील वर्षापेक्षा 50 अतिरिक्त केंद्रे यंदा उघडण्यात आली आहेत. राज्यातील अंदाजे 80 लाख मेट्रिक टन सोयाबीनपैकी सुमारे 25 टक्के सोयाबीन ‘इंटरव्हेन्शन स्कीम’अंतर्गत खरेदी होणार असून बाजारभाव कोसळू नयेत हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे पणन मंत्री रावल यांनी सांगितले. यावेळी चर्चेत विजय वडेट्टीवार, कैलास पाटील, बबनराव लोणीकर आणि प्रकाश सोळंके यांनीही सहभाग घेतला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jaykumar rawaljaykumar rawal newsnagpur winter sessionnagpur winter session 2025nagpur winter session news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page