• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

‘डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला’; खान्देशातील मोठे नेते, माजी मंत्री स्वरुपसिंगजी नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 25, 2025
in नंदुरबार, खान्देश, ताज्या बातम्या
The last rites of Swaroopsinghji Naik, a prominent leader from Khandesh and former minister, were performed with full state honours.

'डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला'; खान्देशातील मोठे नेते, माजी मंत्री स्वरुपसिंगजी नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार

नंदुरबार, 25 : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य, उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, या शब्दात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांना आज श्रद्धांजली वाहिली.

माजी मंत्री स्व. स्वरुपसिंग नाईक यांच्यावर आज नवागाव (ता. नवापूर) येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले त्या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावल बोलत होते.

यावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री अमरीश पटेल, राजेश पाडवी, आमशा पाडवी, राम भदाणे, श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी बोलताना मंत्री रावल म्हणाले, धुळे–नंदुरबार जिल्ह्याचे प्रदीर्घकाळ प्रभावी नेतृत्व स्वर्गीय नाईक यांनी केले. आदिवासी विकासमंत्री पदासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी अत्यंत कुशलतेने व जबाबदारीने सांभाळली. सलग 40 वर्षे विधानसभेवर निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. ही केवळ राजकीय कारकीर्द नव्हे, तर त्यांच्या कार्यावर, प्रामाणिकपणावर आणि नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेली नितांत श्रद्धा होती.

आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सत्तेच्या पदांवर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. त्यांची साधी राहणी, स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जात होते.

स्व. नाईकांचे सर्व पक्षीय नेत्यांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. हे नाते त्यांनी केवळ एका पिढीपुरते न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आपुलकी, स्नेह आणि माणुसकी याची हीच खरी ओळख होती.

स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी उपस्थित गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री अमरीश पटेल राजेश पाडवी,आमशा पाडवी, राम भदाणे श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील यांनीही आपल्या श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Jayakumar Jitendrasinh Rawaljayakumar rawalShirishkumar Surupsing Naiksurupsing naiksurupsing naik death

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page