• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 4, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

जळगाव, 4 फेब्रुवारी : राज्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही शेती उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी असून ही योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही कनेक्टिव्हिटी मिळेल, शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचेल, शेती खर्च कमी होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेची जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न झाली. यावेळी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, रोहयो उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता एस. बी. पाटील, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता संजय राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सदर योजनेचे सादरीकरण केले. “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात येईल. प्रस्ताव, मान्यता, निविदा व प्रत्यक्ष काम या सर्व टप्प्यांवर वेळबद्धता आणि गुणवत्ता यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतातील कामे व शेतमाल वाहतुकीसाठी शेतरस्ते अत्यावश्यक असून अनेक ठिकाणी त्यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मजबूत व बारमाही शेत/पाणंद रस्ते आवश्यक असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना : ठळक वैशिष्ट्ये

▪️ शेतकऱ्यांना शेतापर्यंत मजबूत व बारमाही दळणवळण उपलब्ध करून देणारी योजना

▪️ पूर्णपणे यंत्रसामग्रीवर आधारित शेत/पाणंद रस्त्यांचे बांधकाम

▪️ पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व शेतमाल वाहतुकीसाठी सोयीचे रस्ते

▪️ २५ किलोमीटर क्लस्टर पद्धतीने निविदा प्रक्रिया – जलद व पारदर्शक अंमलबजावणी

▪️ पॅनलवरील निश्चित एजन्सीमार्फत कामे – गुणवत्तेची हमी

▪️ रस्त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या गाळ, मुरूम, दगडावर कोणतीही रॉयल्टी नाही

▪️ भूमी अभिलेख विभागामार्फत मोफत व तातडीची मोजणी

▪️ भूसंपादनाचा खर्च नाही, शेतकऱ्यांवर आर्थिक भार नाही

▪️ अतिक्रमण निर्मूलनासाठी मोफत पोलीस बंदोबस्त

▪️ स्वतंत्र लेखाशिर्ष, विविध निधी व CSR निधीचा प्रभावी वापर

▪️ ग्रामपंचायत ते जिल्हास्तरापर्यंत स्पष्ट जबाबदाऱ्या व सुलभ कार्यपद्धती

▪️ शेतमालाला वेळेवर बाजारपेठ मिळून शेती उत्पादन खर्चात घट व उत्पन्नात वाढ

▪️ ग्रामीण दळणवळण मजबूत होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

हेही वाचा : Ajit Dada Last Phone Call : अजित दादांचा शेवटचा कॉल कोणाला? नेमकं काय बोलले? महत्वाची माहिती आली समोर

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patiljalgaon collector officejalgaon newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

May 28, 2026
ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 28, 2026
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

May 27, 2026
कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

May 27, 2026
अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

May 27, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

May 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page