• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

T20 World Cup 2026 : टीम इंडियाची विजयी सलामी; पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा 29 धावांनी केला पराभव, सुर्यकुमारची वादळी खेळी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
T20 World Cup 2026 :  टीम इंडियाची विजयी सलामी; पहिल्याच सामन्यात अमेरिकेचा 29 धावांनी केला पराभव, सुर्यकुमारची वादळी खेळी

मुंबई, 8 फेब्रुवारी: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार 7 फेब्रवारीपासून सुरू झाला असून, उद्घाटन सामन्यातच टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला निर्धारित 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारतीय संघाची अडखळती सुरुवात –

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात शॅडली वान शल्कविकने सलग फटकेबाजी मोडीत काढत ईशान किशन (20), तिलक वर्मा (25) आणि शिवम दुबे (0) यांना बाद केले. त्या टप्प्यावर भारताची धावसंख्या 46/4 अशी होती.

सुर्याने सावरला भारताचा डाव –

यानंतर रिंकू सिंग (6) आणि हार्दिक पंड्या यांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हार्दिक पंड्या बाद झाला तेव्हा भारताचा स्कोअर 77/6 असा झाला होता. अशा कठीण परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी सातव्या विकेटसाठी 41 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सावरले. अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत 49 चेंडूत नाबाद 84 धावांची वादळी खेळी करत भारताचा डाव सावरला.

या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. भारताने अखेर 9 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. अमेरिकेकडून शॅडली वान शल्कविकने 25 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तर हरमीत सिंगला दोन बळी मिळाले.

…अन् अमेरिकेचा पराभव –

लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघाची सुरुवातही निराशाजनक ठरली. पॉवरप्लेमध्येच तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत संघाला आशा निर्माण करून दिली. मिलिंद कुमारने 34, तर संजय कृष्णमूर्तीने 37 धावा केल्या. मात्र, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीपुढे अमेरिकन फलंदाज टिकू शकले नाहीत. अक्षर पटेलने सलग चेंडूंवर दोन विकेट्स घेत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. अखेर अमेरिकेचा डाव 132 धावांवर आटोपला आणि भारताने सामना 29 धावांनी जिंकला.

हेही वाचा : आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: cricket updatesindvsusamarathi newst20 world cup 2026wankhede stadium mumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

May 17, 2026
बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

May 16, 2026
Crime News: धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद

Crime News: धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद

May 15, 2026
Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

May 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page