जळगाव, 3 ऑक्टोबर: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व आमदार तसेच माजी जिल्हाध्यक्ष स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते उदयजी भालेराव यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला उजाळा दिला. जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य तसेच जनसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा उपस्थितांनी आवर्जून उल्लेख केला.
स्व. हरिभाऊ जावळे यांनी सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वसामान्य नागरिकांशी असलेला संपर्क आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत घेतलेली भूमिका यामुळे त्यांच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, गटनेते प्रकाश बालानी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, अरविंद देशमुख, वैशाली पाटील, विजय बांदल, दीपक परदेशी, शक्ती महाजन, प्रकाश पंडित, मयूर भदाणे, संदीप ढंडोरे, महेश चौधरी, महेश कापुरे, माधुरी देशमुख, सरदार तडवी, दत्तात्रय कापुरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा: पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक






