• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना ₹1,837 कोटींचे वितरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 14, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
VIDEO | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना ₹1,837 कोटींचे वितरण

मुंबई, 14 मार्च: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले

गुवाहाटी येथील समारंभात “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

या कार्यक्रमाद्वारे देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आली. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

या २२ व्या हप्त्यात २.१५ कोटीहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी आसाममधील गुवाहाटी कोकराझार येथे पंतप्रधानांच्या हस्ते १९,४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटी –

राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹१,८३७ कोटींची रक्कम थेट जमा होणार असून या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. थेट लाभ हस्तांतरणाच्या ई- वितरण पद्धतीमुळे (डीबीटी) माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते. विधानभवन समिती कक्षातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव लेखा व कोषागारे रिचा बागला दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पारदर्शक आणि सक्षम व्यवस्था उभारली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जात असल्याने त्यांना शेतीच्या हंगामी कामांसाठी आधार मिळत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वेळेत वितरित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

“राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹१,८३७ कोटी थेट जमा होणार असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी मोठी मदत मिळणार आहे”.

हेही वाचा: VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer newspm kisan samman nidhipm kisan samman nidhi installment distributedpm narendra modisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page