• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम; मुख्यमंत्री यांच्या हस्ते रोहन घुगेंचा गौरव

जळगाव, 28 मार्च: महाराष्ट्र्  राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतुने मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगेंचा गौरव –

आज मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक –

भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे सात सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते. या मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेले  हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे व समन्वयाचे फळ आहे. जिल्हा प्रशासनाचे हे यश समस्त जळगावकर नागरिकांना समर्पित आहे.

 – रोहन घुगे (जिल्हाधिकारी, जळगाव)

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातंर्गत उल्लेखनीय कामगिरी –

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यामध्ये संकेतस्थळाचे आधुनिकीकरण, ‘आपले सरकार’ पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, डिजिटल डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ jalgaon.gov.in हे अद्ययावत व नागरिकाभिमुख स्वरूपात विकसित करण्यात आले असून ते मोबाईलसह सर्व उपकरणांवर सुसंगत करण्यात आले आहे. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर १९ अधिसूचित सेवा पूर्णतः ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ज स्वीकृतीपासून सेवा वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘सेतूदूत जळगाव’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना २४x७ अर्ज स्थिती, तक्रार नोंदणी तसेच विविध योजनांची माहिती उपलब्ध होत आहे. तसेच जिल्हा स्तरावर विकसित करण्यात आलेला डिजिटल डॅशबोर्ड मुख्यमंत्री डॅशबोर्डशी एकात्मिक करण्यात आला असून विविध योजना व कार्यक्रमांची रिअल-टाइम माहिती उपलब्ध होत आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीद्वारे शासकीय गोदामांतील धान्य साठ्याचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित मोजणी व सुरक्षा देखरेख करण्यात येत आहे. तसेच GIS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, जलस्रोत व पायाभूत सुविधांचा स्थानिक डेटाबेस तयार करण्यात आला असून नियोजन व संसाधन व्यवस्थापन अधिक अचूक झाले आहे.

हेही वाचा: सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavise-governance reform programias rohan ghugejalgaon collector officejalgaon newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 14, 2026
नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 14, 2026
कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

August 13, 2026
सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

August 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page