• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न; जळगाव जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांनी केले आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 23, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 23 नोव्हेंबर: गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने व एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ शासकीय अभियान नसून गावागावांत विकासाची लोकचळवळ उभी करण्याची मोठी संधी आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने स्पर्धात्मक भावनेतून नियोजनबद्ध काम करावे आणि जळगाव जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव नन्नवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, शाळा, रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवावा. स्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे.

जनसुविधा योजनेंतर्गत ९० कोटी रुपयांचा निधी –

जनसुविधा योजनेंतर्गत ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून गावांमध्ये स्मशानभूमी, रस्ते, पाण्याच्या टाक्या, सीसीटीव्ही कॅमेरे आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील कोणतेही गाव मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

जलसंधारण आणि घरकुल योजनांना प्राधान्य द्या –

आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचे आव्हान लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना विशेष प्राधान्य देण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. जलतारा उपक्रमाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. गावातील जलसाठा वाढविण्यासाठी लोकसहभागातून कामे हाती घ्यावीत. तसेच मंजूर घरकुलांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांना गती द्यावी. सध्या सुमारे ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, उर्वरित घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा संपूर्ण लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी द्याव्यात –

ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी गावनिहाय जबाबदारी निश्चित करून प्रत्यक्ष क्षेत्रभेटी द्याव्यात. केवळ बैठका आणि भाषणांपुरते मर्यादित न राहता गावांमध्ये जाऊन विकासकामांचा आढावा घ्यावा. विकासाच्या प्रक्रियेत सर्व विचारांच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनाही सहभागी करून घ्यावे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्ती अभियानाप्रमाणेच लोकसहभागातून गावांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता येतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांचे गावविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

यावेळी मिश्कील टिप्पणी करताना पालकमंत्री म्हणाले की, सरकार हे जीआर आणि सीआरवर चालते; मात्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून उभी राहणारी चळवळ केवळ ग्रामपंचायतींचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुरती मर्यादित राहू नये, तर ती संपूर्ण गावाची लोकचळवळ बनली पाहिजे.

गावांच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा समन्वय महत्त्वाचा – खासदार स्मिता वाघ

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, आमच्या सार्वजनिक कार्याची जडणघडण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव सक्षम आणि समृद्ध झाले पाहिजे. काही ग्रामपंचायती अतिशय चांगली विकासकामे करीत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून गावांमध्ये चांगली कामे उभी राहू शकतात. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पारितोषिकापेक्षा गावांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामपंचायतींनी केवळ पारितोषिक मिळविण्यासाठी नव्हे, तर गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्लास्टिकमुक्त गाव, स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकसहभागातून करावी. अभियानातील १०० गुणांच्या मूल्यमापन निकषांनुसार नियोजन करून सर्व १६ विभागांनी समन्वयाने काम करावे. दरमहा विकासकामांचा आढावा घेतला जाईल. लोकसहभागातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य व निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जळगाव जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

अभियानातून गावागावांत मूलभूत बदल घडविण्याचा प्रयत्न – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर म्हणाल्या की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश केवळ पारितोषिक मिळविणे हा नसून, या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत मूलभूत बदल घडवून आणणे हा आहे. आगामी काळात हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात पुढे न्यावे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि उद्दिष्टपूर्तीच्या भावनेतून काम करावे, असे त्यांनी सांगितले.

विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन –

कार्यशाळेदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी उपस्थितांना गाव दुष्काळमुक्तीची सामूहिक शपथ दिली. महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांनी बालविवाहमुक्त भारताची प्रतिज्ञा दिली.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव नन्नवरे यांनी पाणीबचतीविषयी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील ग्रामपंचायतींची भूमिका या विषयावर भाऊसाहेब अकलडे यांनी, महिला बचत गट या विषयावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी, तर दुष्काळ निवारणातील चारा साक्षरता अभियान या विषयावर सहाय्यक पशुधन आयुक्त प्रदीप झोड यांनी मार्गदर्शन केले.

कृषीविषयक गुणांकन या विषयावर कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के, सुशासन या विषयावर गटविकास अधिकारी अंजली बर्गे, तर विकसित भारत रोजगार आजीविका मिशन या विषयावर एन. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले, तर गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला,सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक आजी-माजी पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा: ‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsminister gulabrao patilmspa 2.0mukhyamantri samruddha panchayat raj abhiyansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 23, 2026
‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय  राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

November 22, 2026
“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 22, 2026
राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

November 21, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026
वीज चोरी करणाऱ्या 43 संशयितांवर कारवाईचा बडगा! वरखेडी कक्षांतर्गत कुऱ्हाड खुर्द येथे महावितरणची विशेष तपासणी मोहीम

वीज चोरी करणाऱ्या 43 संशयितांवर कारवाईचा बडगा! वरखेडी कक्षांतर्गत कुऱ्हाड खुर्द येथे महावितरणची विशेष तपासणी मोहीम

November 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page