• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

सुमित पाटील यांच्या बिनविरोध निवडीच्या सत्कार सोहळ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 22, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा, 22 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानिमित्त सुमित किशोर आप्पा पाटील यांचा आज दुपारी पद्माजाई फार्म हाऊस, बांबरूड-महादेवाचे येथे भव्य सत्कार पार पडला. या कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून झालेल्या घडामोडींवर भाष्य करत, विरोधकांवर निशाणा साधला. तसेच सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत स्वतःची भूमिका स्पष्ट केलीय.

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –

आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात सुमित पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जाहीर समर्थन केले. “सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही. तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो,” असे म्हणत त्यांनी सुमित यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. आम्ही स्वाभिमान जिवंत ठेवून राजकारण करतो. दादागिरी किंवा कोणाचे हातपाय छाटण्याची धमकी देऊन राजकारण न करता जनतेच्या हृदयावर प्रेम करुन त्यांच्या हृदयावर राज्य करून आम्ही या ठिकाणी राजकारण करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर भाष्य केले.

‘७५ मतदारांचा पाठिंबा; बिनविरोध निवडीचे श्रेय घेऊ नये’ –

सुमित पाटील यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदी पाठवणाऱ्या जनतेनेच तीन-तीन वेळा विधानसभेचा सदस्य म्हणूनही निवडून दिले आहे. त्यामुळे पाचोरा-भडगावच्या जनतेवर उपकार केल्याची भाषा करण्याची आवश्यकता नाही, असे किशोर आप्पा पाटील म्हणाले. यावेळी सत्कार सोहळ्यात बोलताना किशोर आप्पा पाटील यांनी विकास सोसायट्यांचे चेअरमन, संचालक आणि मतदारांचे आभार मानले.

दरम्यान, ७९ पैकी जवळपास ७५ मतदारांनी एकतर्फी सुमित पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पाठिंबा दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. समोरच्यांनी टेक्निकल ग्राउंडवर सुमितला निवडणुकीतून बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्याला यश आले नाही. ग्राउंडवरील परिस्थिती पाहता सुमितची निवड बिनविरोध झाली असली तरी कोणीही या निवडीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले.

‘अदृश्य शक्ती’चा उल्लेख करत केली टीका –

सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्यानंतर त्यांनी ‘अदृश्य शक्ती’चा हात असल्याचा उल्लेख केला होता. यावर बोलताना किशोर आप्पा पाटील म्हणाले की, त्या वेळी अदृश्य शक्ती कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली नव्हती. मात्र, आता संबंधित शक्तीनेच आपण ती असल्याचे जाहीर केले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात आमदार किशोर आप्पा आक्रमक –

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत सांगितले की, त्या अदृश्य शक्तीने फोन करून अधिकाऱ्याला दम दिला आणि सुमितचा फॉर्म उडवायला लावला, असे स्वतःच सांगितले. आता मनोज चौधरी नावाचे निवडणूक निर्णय अधिकारी कसे वाचतात, हे पाहायचे आहे. दरम्यान, एखाद्या अधिकाऱ्याने कोणाच्या तरी फोनवरून उमेदवारी अर्ज बाद करण्याची हिंमत दाखवली असेल, तर त्याला त्याचा रस्ता दाखवल्याशिवाय किशोर आप्पा स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

युतीच्या उमेदवारांना 100 टक्के मदतीची ग्वाही –

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसैनिक महायुतीच्या खासदार पदाच्या उमेदवाराच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहतात. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात विरोधकांना पक्षात प्रवेश दिला जातो. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी दरवाजे बंद असल्याचे सांगितले होते; मात्र तो दरवाजा कायमस्वरूपी बंद ठेवण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. जनतेने साथ दिल्यामुळेच आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साडेबारा हजार मतांचे मताधिक्य मिळाले आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवून त्या नगराध्यक्ष झाल्या, असे किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांना शंभर टक्के मदत करण्याची ग्वाही दिली. युतीचा घटक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहू. तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्याची जनता युतीच्या उमेदवारांसोबत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेची स्थिती चांगली; सहकार क्षेत्राला बळ देण्याची गरज –

जळगाव जिल्हा बँकेला पाचोरा तालुक्यातील सहकार महर्षींचा वारसा लाभला असून, राज्यातील अनेक जिल्हा बँका अडचणीत असताना आपली बँक आजही चांगल्या स्थितीत असल्याचे किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. मात्र, बंद पडलेल्या साखर कारखान्यांमुळे बँकेच्या थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला असून, कारखाने सुरू करून किंवा विक्री करून थकीत कर्जाची वसुली करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

५५२ विकास सोसायट्या अडचणीत –

जळगाव जिल्ह्यातील ५५२ विकास सोसायट्या अनिष्ट तफावतीच्या स्थितीत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सहकार क्षेत्रातील अडचणी मांडल्या. विकास सोसायट्यांनी केवळ शेतकऱ्यांना कर्जवाटप आणि वसुलीपुरते मर्यादित न राहता रेशन दुकाने, बियाणे आणि खत विक्रीसारखे व्यवसाय सुरू करावेत. सोसायट्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन शेतकऱ्यांना स्वतःच्या ताकदीवर कर्ज देण्याची क्षमता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच येत्या काळात विकासोच्या सचिवांच्या वेतनासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२९ तारखेला १०० टक्के मतदानाचे आवाहन –

जिल्हा बँकेला भविष्यात कोणतेही संकट आले, तरी महायुतीचे सरकार बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही किशोर आप्पा पाटील यांनी दिली. तसेच २९ तारखेला होणाऱ्या मतदानात विकास सोसायट्यांच्या मतदारांनी १०० टक्के मतदान करून युतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन केले. जिल्हा बँकेला पुन्हा एकदा आशिया खंडात नावलौकिक मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व 2026’ सोहळा दिमाखात संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: jdcc bank election 2026mangesh chavhanmarathi newsmla kishor appa patilsumit patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 22, 2026
राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

November 21, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026
वीज चोरी करणाऱ्या 43 संशयितांवर कारवाईचा बडगा! वरखेडी कक्षांतर्गत कुऱ्हाड खुर्द येथे महावितरणची विशेष तपासणी मोहीम

वीज चोरी करणाऱ्या 43 संशयितांवर कारवाईचा बडगा! वरखेडी कक्षांतर्गत कुऱ्हाड खुर्द येथे महावितरणची विशेष तपासणी मोहीम

November 21, 2026
‘महाशक्तीचा आदेश आल्यानंतर अदृश्य शक्तीला मदत करावीच लागली!’; बिनविरोध निवडीनंतर सुमित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाशक्तीचा आदेश आल्यानंतर अदृश्य शक्तीला मदत करावीच लागली!’; बिनविरोध निवडीनंतर सुमित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

November 17, 2026
यावल येथे उद्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा समारोप; आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण

यावल येथे उद्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा समारोप; आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण

November 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page