• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 17, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा, 17 एप्रिल: आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादी अचूक आणि सक्षम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदार यादी हीच आपल्या राजकीय आयुष्याची खरी शिदोरी आहे. त्यामुळे ती अद्ययावत व अचूक ठेवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. यामुळे पक्षाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी जबाबदारीने आणि समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.

देशभरात सुरू झालेल्या जनगणना प्रक्रियेबरोबरच लवकरच मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना BLA मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

BLA यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन –

पाचोरा-भडगाव मतदारसंघात SIR मोहिम प्रभावीपणे राबवण्यासाठी बीएलओंच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी BLA यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या BLA यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पाटील यांनी SIR प्रक्रियेचे महत्त्व आणि त्यातील बारकावे सविस्तरपणे मांडले.

BLA यांनी काटेकोरपणे काम करणे आवश्यक –

पुढील चार महिने मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच BLA आणि सह-BLA म्हणून नियुक्त पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काटेकोरपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, नियुक्त कार्यकर्त्यांना मतदार याद्यांवर प्रभावी काम करता यावे यासाठी लवकरच तज्ज्ञांकडून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. SIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बीएलओंच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवत प्रत्यक्षात काम कसे करावे, याबाबतही आमदार पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि BLA यांना सखोल मार्गदर्शन केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले.

यांची होती उपस्थिती –

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील, अरूण पाटील, लखीचंद पाटील, शालीग्राम मालकर, राजेंद्र पाटील, विनोद तावडे, महिला पदाधिकारी नगरसेवक आणि नगरसेविका, शिवसेनेचे विविध आघाडीचे पुरूष आणि महिला पदाधिकारी तसेच पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने नेमण्यात आलेले बीएलए मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: booth level agentsmla kishor appa patilpachora newsSIRsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस अन् मंत्री गुलाबराव पाटील यांना आली गुवाहटी बंडाची आठवण, नेमकं काय म्हणाले?

June 5, 2026
भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 2 लाख रुपयांहून अधिकचा साठा जप्त

June 5, 2026
Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

Breaking! वावडदा येथे बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच वाटपात पैशांची वसुली; Anti Corruption ची धडक कारवाई

June 4, 2026
विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत; उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर अपडेट

June 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page