• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home रावेर

तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 30, 2026
in रावेर, ताज्या बातम्या
तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

रावेर, 30 एप्रिल: किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण सुविधा आता रावेरमध्ये उपलब्ध होणार आहे. तापी परिसरातील पहिले शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू होत असून, या केंद्राचे लोकार्पण उद्या, दि. १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील निवडक आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस सेंटरचे लोकार्पण करण्यात येत असून, त्यामध्ये रावेर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रावेरसह यावल, फैजपूर, मुक्ताईनगर आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी डायलिसिस उपचारासाठी रुग्णांना जळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय, प्रवासाचा त्रास आणि आर्थिक भार सहन करावा लागत होता. मात्र आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचे हाल कमी होणार असून, उपचार अधिक सुलभ होणार आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिससाठी मोठा खर्च करावा लागत असताना, शासनमान्य या केंद्रात रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा फायदा होणार आहे.

या संदर्भात आमदार अमोल जावळे म्हणाले, “रुग्णांना वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. रावेर येथे डायलिसिस सेंटर सुरू होणे म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना नवसंजीवनी मिळेल, असा मला विश्वास आहे.”

उद्याच्या या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक स्तरावर संबंधित अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार असून, शासनाच्या या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे. आमदार जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही सुविधा रावेरला मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: dialysis centermarathi newsmla amol jawaleonline inaugurationsuvarna khandesh livetapi region

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page