• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जनगणना या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मैदानावर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जनगणना या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 1 मे: जनगणना ही केवळ लोकसंख्येची गणना नसून देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अचूक माहिती अत्यंत आवश्यक असते. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक व पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्ताने येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरिश सहाय, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण,स्वातंत्र सैनिक, नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन, पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, यावर्षी ही जनगणना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्णतः डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे २६ या कालावधीत “स्वयं गणना” नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात माझ्यापासून होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधली असून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमांतर्गत १ प्राथमिक आरोग्य केंद्र व १७ उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे, “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” मोहिमेद्वारे लोकसहभागातून आरोग्य जनजागृती, माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण निर्मूलन व स्वच्छतेवर प्रभावी भर दिला जात आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाखो लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले असून सुमारे ४ लाख नागरिकांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. यासाठी शासनामार्फत ९१८ कोटी ५२ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे.

रोजगार व शेती क्षेत्रातही विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात कामगिरी करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ हजार ६ नवीन उद्योगांना बँकांकडून मंजुरी मिळाली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे ८ लाख ५१ हजार शेतकरी व ६ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शासनाने ७०९ कोटी ६२ हजार रुपयांची मदत मंजूर करून त्यापैकी ५१३ कोटी २१ लाख रुपये थेट ६ लाख ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

जिल्ह्यात गेल्यावर्षी विविध कल्याणकारी योजनांतून कामगारांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला असून यामध्ये ५८ हजार ६०७ कामगारांना सुरक्षा कीट, १लाख ७८ हजार लाभार्थ्यांना गृह उपयोगी संच,२ लाख ४९ हजार कामगार व कुटुंबियांची यांना आरोग्य तपासणी तसेच १४ हजार ३५० लाभार्थ्यांना ३६ कोटी ६० लाखांचे आर्थिक सहाय्य देत कामगारांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणाला भक्कम आधार मिळाला आहे.

नागरिकांनी वाढते तापमान लक्षात घेता उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. विशेषतः शेतकरी बांधव आणि कामगार वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी घेत सकाळी आणि सायंकाळीच कामे करावीत. प्रखर उन्हामुळे उष्माघात, थकवा आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे थोडीशी काळजी घेतली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो, असे सांगत सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्यावासीयांना त्यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली त्यानंतर त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदीची भेट घेतली व त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विभागातंर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय यांचा समावेश आहे.

याप्रसंगी पोलीस , होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, आरोग्य विभाग, महानगरपालिका अग्निशमन आदी विभाग परेड संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शासकीय कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा: Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

बातमी शेअर करा !
Share
Tags: censuscensus 2026guardian minister gulabrao patilmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page