• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 26, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना

जळगाव, 26 मे: जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सून काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आगामी मान्सूनपूर्व व मान्सून काळात विविध पातळीवर करावयाची पूर्वतयारी आणि विभागनिहाय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहतूक अडथळे, पाणी साचणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना दिल्या.

गाव व शहर पातळीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून आवश्यक उपाययोजना करण्यासह नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांनी रस्ते, पूल व नाल्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभागाने वीजवाहिन्यांलगत धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

तसेच आरोग्य विभागाने साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी औषधसाठा, आरोग्य पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, तर महसूल, पोलीस, परिवहन, कृषी, दूरसंचार व इतर विभागांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. नदी, नाले व धरण परिसरातील नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्याबाबतही संबंधित विभागांना निर्देशित करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे  उपस्थित होते.

हेही वाचा: “……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: disaster management¸ monsoon season 2026jalgaon dm rohan ghugejalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page