• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 28, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धरणगाव
फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

जळगाव, 28 मे: अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे काल 27 मे रोजी धरणगाव तालुक्यातील भवरखेड येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) यास खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रंगेहात पकडले.

बनावट दूध निर्मितीवर कारवाई –

तपासणीदरम्यान रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील वसा (फॅट) वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा पंच भवरखेडेचे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपी सोमनाथ आनंदा माळी हा लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भा.प्र.से. तसेच सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार व आकाश बोहाडे यांनी सहभाग घेतला.

यापुर्वीही पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई –

विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही दुधात भेसळ केल्याप्रकरणी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. त्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल  दि. २९ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित व्यक्ती वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान,  परिसरात कुठेही बनावट दूध अथवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा: ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: adulterated milkFood and Drug Administrationjalgoan newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

फॅट वाढविण्यासाठी बनावट दूध निर्मिती; भवरखेड येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पकडले रंगेहात

May 28, 2026
ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 28, 2026
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

May 27, 2026
कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

May 27, 2026
अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

May 27, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

May 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page