जळगाव, 18 जून: महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी आज जिल्ह्यातील सर्व सात मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात पात्र असलेल्या एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात एकूण ९७.७८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
अंतिम आकडेवारीनुसार ३१५ पुरुष मतदारांपैकी ३०९ पुरुष (९८.१० टक्के) तसेच ३१५ महिला मतदारांपैकी ३०७ महिला (९७.४६ टक्के) यांनी मतदान केले. मतदान केंद्रनिहाय अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल व पाचोरा येथे १०० टक्के मतदान नोंदविण्यात आले. भुसावळ येथे ९८.३१ टक्के, तर चाळीसगाव येथे ७०.७३ टक्के मतदान झाले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा, मनुष्यबळ व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.






