नांदेड, 10 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव (बा.) येथे दि.12 सप्टेंबर सकाळी 10 वाजता एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय विद्यार्थ्यांना देश-विदेशातील शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या संधी’ या विषयावर ही राष्ट्रीय कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चेव्हनिंग स्कॉलर तथा एकलव्य इंडिया या संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने सहभाग घेता येणार आहे. तसेच ही कार्यशाळा पूर्णपणे निःशुल्क आहे.
राजू केंद्रे प्रमुख मार्गदर्शक –
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चेव्हनिंग स्कॉलर तथा एकलव्य इंडिया या संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दुसरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अस्पर इन्स्टि्ट्यूट हार्वर्ड विद्यापीठातील APL 22 फायनालिस्ट व भारताच्या राजदूत तथा एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या सह-संस्थापिका स्मिता ताटेवार या उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेचे उद्दिष्ट्य –
सदर कार्यशाळेच्या माध्यमातून भारतामध्ये कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत, तसेच त्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, नियम व अटी आणि त्या पूर्ण करण्यासाठी वैधानिक प्रक्रिया कशी असणार आहे, यासंदर्भात राजू केंद्र व स्मिता ताटेवार यांच्याकडून विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रा. दर्शन तळहांडे व प्रा. सुभाष गालेवर यांच्यासोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (संपर्क नं.- 9923032305)
कार्यक्रमाचे अध्यक्ष –
एज्युकेशन सोसायटी नायगांव (बा.) संचलित शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व करिअर गाईडन्स विभाग नागपूरातील कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयातील वनस्पतीशास्र व काऊन्सिलिंग सेल विभाग आणि सीर भारत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच अध्यक्ष तथा ना.जि.म.स. बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे दुसरे अध्यक्ष नागपूर येथील श्री. सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे –
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव प्रा. रविंद्र चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएस अधिकारी गौहर हसन, नांदेडचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, बिलोली-नांदेडचे पोलीस उपधीक्षक हानपुडे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी जीवनाला सकारात्मक कलाटणी देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अधिकाधीक विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. के. हरिबाबू प्राचार्य शरदचंद्र महाविद्यालय नायगांव (बा.) व डॉ. शरयू तायवाडे प्राचार्य तायवाडे महाविद्यालय कोराडी, नागपूर या दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांतर्फे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संयोजक –
डॉ.श्याम पाटील (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, शरदचंद्र महा.), डॉ. सुवर्णा पाटील (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, तायवाडे महा.) प्रा.दर्शन तळहांडे (ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी ऑफ वर्कशॉफ), प्रा. साईनाथ गायकावाड (प्रमुख, करिअर गाईडन्स सेल), डॉ. अजय रामटेके (कन्व्हेनर काउन्सिलिंग सेल, तायवाडे महाविद्यालय), प्रशांत बिलोनीकर (कार्या. अधि., शरदचंद्र महाविद्यालय), डॉ. साईनाथ वाघमारे (सदस्य, करिअर गाईडन्स सेल) आदी या कार्यशाळेचे संयोजक आहेत.