• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

ठाणे, 22 ऑगस्ट: व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.

नेरूळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीज सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित या सोहळ्यास वन मंत्री गणेश नाईक, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेश बालदी, रवींद्र फाटक, विक्रम पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, पनवेलच्या महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांचे आकर्षण आणि त्याचे होणारे गंभीर सामाजिक, शारीरिक व मानसिक परिणाम लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयीन परिसर हा युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याने या वयोगटात योग्य माहिती व जागरूकता निर्माण करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

भारताच्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशाची ६५% युवाशक्ती ही आपली मोठी ताकद आहे. या युवाशक्तीला निष्प्रभ करण्यासाठी शत्रू राष्ट्रे आणि असामाजिक घटक तरुणांना व्यसनाच्या आहारी घालण्याचे षड्यंत्र रचत आहेत. या लढाईत अमली पदार्थांची पुरवठा साखळी पूर्णपणे नेस्तनाबूत करणे आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करून अशा पदार्थांची मागणी संपवणे, असा सर्वांगीण ३६०-डिग्री अप्रोच ही काळाची गरज आहे.

‘नो टू ड्रग्ज’चा संदेश –

प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हे या लढाईचे केंद्र असून प्रत्येक विद्यार्थी या नशाविरोधी मोहिमेचा सैनिक आहे. व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना भेदभाव न करता व्यसनमुक्ती केंद्रांच्या (डी-एडिक्शन सेंटर) माध्यमातून मदत केली जाईल. तरुणाईच्या साथीने नशा पराभूत होईल आणि ‘सुजलाम सुफलाम’ व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

पोलीस, महानगरपालिका, नागरिक आणि तरुणाईच्या संयुक्त प्रयत्नांतून नवी मुंबईला पूर्णपणे नशामुक्त आणि सुरक्षित बनवण्याचा संकल्प या वेळी सोडण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र व व्यसनमुक्त चित्रफितीचे यावेळी  लोकार्पणही करण्यात आले. या अभियानानिमित्त आयोजित जनजागृतीपार पोस्टर्स व रील्स स्पर्धेतील प्रत्येकी तीन सर्वोत्तम विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा:  उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: campus connect special campaigncm devendra fadnavisdrug-free navi mumbaimarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page