• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 22, 2026
in चाळीसगाव, ताज्या बातम्या
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगाव, 22 ऑगस्ट: शहरातील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसह विविध जलजन्य व कीटकजन्य आजार तसेच कुष्ठरोग आणि एचआयव्ही-एड्सबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी हे शिबिर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक हिवताप, नाशिक डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. बांगर आणि हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील समुपदेशक नामदेव अहिरे, एलएसओ सचिन महाले, आरोग्य सेवक दीपक ठाकरे, चेतन गुढेकर यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध आजारांबाबत मार्गदर्शन केले. डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग आणि हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.

तसेच जलजन्य व साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. एचआयव्ही-एड्स आणि कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याबरोबरच या आजारांबाबत योग्य माहिती व प्रतिबंधात्मक उपायांची माहितीही देण्यात आली.

शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक माहिती आत्मसात करून ती आपल्या कुटुंबीयांपर्यंत व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांबाबत माहिती जाणून घेतली. या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. आरोग्य विभागाच्या या जनजागृतीपर उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी कौतुक केले.

हेही वाचा: व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon newshealth awareness camphealth update newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page