• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 4, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

जळगाव, 4 सप्टेंबर: भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी नाशिक येथील सक्रिय कार्यकर्ते शिवम शिंपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

शिवम शिंपी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरदेवळा येथे झाले. त्यानंतर त्यांनी जळगाव येथे उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीनिमित्त ते नाशिक येथे स्थायिक झाले.

नाशिक येथे आल्यानंतर त्यांनी भाजपच्या सोशल मीडिया टीममध्ये काम करत पक्षाच्या विविध कार्यक्रम, उपक्रम आणि अभियानांच्या नियोजनासह त्यांचे प्रभावी रिपोर्टिंग केले. तसेच पक्षाच्या कार्यालयीन व्यवस्थापनातही त्यांनी योगदान दिले. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम करत त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत योगदान दिले. पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांची पक्षात विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

‘पदापेक्षा जबाबदारी मोठी’ –

नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना शिवम शिंपी म्हणाले, “हे पद नसून पक्षाने माझ्यावर टाकलेली मोठी जबाबदारी आहे. एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेचा आणि मेहनतीचा पक्षश्रेष्ठींनी केलेला हा सन्मान आहे. उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामकाजाची माहिती वेळेवर देणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि सर्व विषयांचे अहवाल अद्ययावत ठेवणे ही माझी प्रमुख जबाबदारी असेल.”

दरम्यान, या नियुक्तीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवम शिंपी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpbjp north maharashtra regional officemarathi newsshivam shimpisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

September 4, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page