• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 4 सप्टेंबर: सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळांमुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम करावे लागल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध तपासणी आणि उपचार शिबीराला भेट देऊन पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार, आदींसह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांचे काम हे २४ तास सुरू असते. कामाचे निश्चित वेळापत्रक नसल्याने अनेकदा तासनतास रस्त्यावर, घटनास्थळी तसेच रात्री-अपरात्री काम करावे लागते. त्याचा साहजिकच आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा नियमित आरोग्य तपासण्या होत नसल्यामुळे एखादा आजार बळावल्यानंतर त्याचे निदान होते. त्याऐवजी अशा आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपचार करता येतील. या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर, नामांकित संस्था आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पत्रकारांसोबतच तासनतास उभे राहून काम करणाऱ्या कॅमेरामनसाठीही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांसाठी स्टॉकिंगची व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाऱ्या विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदत व समन्वयासाठी नोडल अधिकारी

पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व संघटनांचे अभिनंदन केले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजारपणाच्या प्रसंगी आवश्यक ती मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय समन्वयासाठी मदत करणार आहे. हे आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने पत्रकारांना आरोग्यविषयक आवश्यक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने पत्रकारांना एकाच ठिकाणी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम पत्रकारांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याची प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली.

शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

या शिबिरात विविध वैद्यकीय विभागांमार्फत पत्रकारांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली.  न्यूरोलॉजिस्ट तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, पुणे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार,ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने,पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, लठ्ठपणा निवारण तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, यकृत प्रत्यारोपण व पोटविकार तज्ज्ञ डॉ. विभा वर्मा  हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण मुंडे, जनरल मेडिसिन डॉ. मधुकर गायकवाड, यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांशी संवाद साधत आरोग्यविषयक तपासणी करीत मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी, नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, कर्करोग, रक्त तपासणी, श्वसनविकार, पोट व पचनसंस्थेचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य, औषध वितरण, वजन नियंत्रण, आयव्हीएफ व वंध्यत्व उपचार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी आदी विविध वैद्यकीय विभागांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दंतचिकित्सा, कर्करोग व नेत्ररोग तपासणीसाठीही स्वतंत्र सुविधा ठेवण्यात आली होती.

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शिबिरातील विविध विभागांना भेट देऊन डॉक्टर, वैद्यकीय पथक आणि पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी पाहणी केली.

शिबिरामध्ये जे.जे. रुग्णालय, जी. टी. रूग्णालय, सेंट जॉर्ज, कामा रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, आर. ए. पोदार, के. जी. मित्तल, मुंबादेवी रूग्णालय, कुपर रुग्णालय, नायर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदूजा हॉस्पिटल, रिलाईन्स रुग्णालय आणि सेफी रुग्णालयासह मनपा रूग्णालयातील विविध आजारांचे सुमारे ६०० तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर सहायक सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुमारे ८९२ पत्रकार आणि इतरांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. शिवाय काही पत्रकारांना शासकीय रूग्णालयात संदर्भित करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टेलिव्हीजन जर्नालिस्ट असोसिएशन (टिव्हीजेए, मुंबई हिंदी पत्रकार संघ, मुंबई क्राईम रिपोर्टस असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे न्युज फोटोग्राफर असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, व्हॉइस ऑफ मिडिया, पत्रकार विकास संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnaviscmrfjournalists healthmarathi newssuvarna khandesh livevidhanbhawan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

September 4, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page