• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 8, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

मुंबई, 8 सप्टेंबर:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गतिमानता वाढविण्याच्या दृष्टीने विविध गुणात्मक व रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणून उमेदवारांना वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.

अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले, आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 अशा एकूण 84 चाळणी परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. शासनाकडून भरतीची मागणी प्राप्त होण्यापासून ते अंतिम निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी विविध स्तरांवर कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले असून, निकालासाठी होणारा प्रदीर्घ विलंब कमी करण्याबरोबरच एका महिन्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आपल्याविरोधात सातत्याने आरोप होत असल्याचे आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम आपण पदावर रुजू होण्यापूर्वीचा असून, तक्रार प्राप्त होताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. विभागीय स्तरावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

एमपीएससीची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळावे, हा आपला प्रमुख उद्देश असल्याचेही भीमनवार यांनी म्हटले आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष व्यवस्था उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, यापुढेही ते सुरू राहतील. तथापि माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षण सुद्धा मी या पदावर राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra public service commissionmarathi newsmpsc chairman vivek bhimanwarmpsc updatesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page