जळगाव, 11 सप्टेंबर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या जन्मदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रभर ५०० हून अधिक ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात २३ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा, तालुका तसेच औद्योगिक परिसरांमध्ये ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योग व आस्थापनांनी त्यांच्याकडील उपलब्ध रिक्त पदांची माहिती “दिलेल्या Google Form” (https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6) द्वारे अथवा क्यूआर कोड स्कॅन करून भरावी. तसेच “महास्वयम् रोजगार पोर्टल” (https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home_employer) वर उद्योजक युझर आयडी व पासवर्डने लॉगीन करून जॉब फेअर या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा क्र. २१ ते ४३ – रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ०१ ते २३’ अंतर्गत संबंधित रोजगार मेळाव्यासाठी रिक्त पदांची मागणी (Vacancy Notification) नोंदवावी.
रोजगार मेळाव्यांसाठी संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे किंवा रिक्त पदे अधिसूचित करण्यासंदर्भात काही अडचण असल्यास अथवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सहायक आयुक्त, संदिप ज्ञा. गायकवाड, यांनी केले आहे.






