ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 ऑक्टोबर: महसूल व वन विभागांतर्गत जिल्हा प्रशासनातील सर्व तालुक्यांमधील आस्थापनेवर रिक्त असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपविभागनिहाय सविस्तर जाहिरात आणि भरतीचे वेळापत्रक https://jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांना २१ ऑक्टोबर २०२६ पासून ४ नोव्हेंबर २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करतांना काही समस्या किंवा तांत्रिक अडचणी आल्यास ९६८९९११००७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
पाचोरा-भडगाव तालुक्यासाठी असलेली रिक्तपदे –

हेही वाचा: 




