• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 21, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव, 21 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (Framework for Fertilizer Sale – FFS) या नवीन खत खरेदी-विक्री प्रणालीची अंमलबजावणी उद्या २२ ऑक्टोबर २०२६ पासून करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार खतांची उपलब्धता जाणून घेणे, खत विक्री केंद्राची निवड करणे आणि खतांचे बुकिंग करणे अधिक सोयीचे होणार आहे.

घरबसल्या खतांची उपलब्धता आणि बुकिंगची सुविधा –

सध्याच्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक खतांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यासाठी तसेच खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांना भेट द्यावी लागते. अनेकदा खत खरेदीसाठी रांगेत थांबावे लागते. मात्र, FFS प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या परिसरातील खत विक्री केंद्रांमध्ये कोणती खते उपलब्ध आहेत, याची माहिती मिळवता येणार आहे. तसेच, आवश्यकतेनुसार उपलब्ध खतांचे आगाऊ बुकिंग करण्याची सुविधाही मिळणार आहे.

शेतजमिनीच्या आधारे QR कोड; खरेदी प्रक्रिया होणार सुलभ –

या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या तपशिलांच्या आधारे आवश्यक डिजिटल प्रक्रिया पूर्ण करून QR कोड उपलब्ध करून दिला जाईल. शेतकरी संबंधित प्रणालीतून सूचित करण्यात आलेल्या खत विक्री केंद्रावर जाऊन हा QR कोड दाखवू शकतील. त्यानंतर खत विक्रेत्याकडून QR कोड स्कॅन करून आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करता येईल. यामुळे खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ व सुव्यवस्थित होण्यास मदत होईल.

खतांसोबत इतर निविष्ठा खरेदीची सक्ती रोखण्यास मदत –

खत खरेदी करताना काही ठिकाणी शेतकऱ्यांना इतर कृषी निविष्ठा किंवा उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आढळतात. FFS प्रणालीमुळे खतांची उपलब्धता, बुकिंग आणि विक्री यामध्ये अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल. परिणामी, खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती रोखण्याच्या दृष्टीने ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

खतांचा काळाबाजार आणि गैरवापर रोखण्यासाठी उपयुक्त –

खतांच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे, खतांचा अनधिकृत साठा व वळवणूक रोखणे आणि खतांचा कृषीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणारा वापर नियंत्रित करणे, या दृष्टीनेही FFS प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. खतांच्या खरेदी-विक्री प्रक्रियेचे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळे खत वितरणावर देखरेख ठेवणे अधिक सुलभ होईल. परिणामी, खतांच्या वितरण व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास आणि अनियमिततेला आळा घालण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांसाठी डिजिटल आणि पारदर्शक खत वितरण व्यवस्था –

FFS प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार असून खत खरेदीसाठी वारंवार कृषी सेवा केंद्रांना भेट देण्याची आवश्यकता कमी होईल. खतांची उपलब्धता जाणून घेण्यापासून ते बुकिंग व प्रत्यक्ष खरेदीपर्यंतची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल. ही प्रणाली शेतकरीकेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित खत वितरण व्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ पासून कार्यान्वित होणाऱ्या FFS प्रणालीची माहिती करून घ्यावी आणि उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

पद्मनाभ म्हस्के

कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

हेही वाचा: संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ffsframework for fertilizer sale systemmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

October 21, 2026
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

October 21, 2026
कोतवाल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; पाचोरा तालुक्यातील आठ, तर भडगाव तालुक्यातील सहा ठिकाणी रिक्तपदे

कोतवाल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; पाचोरा तालुक्यातील आठ, तर भडगाव तालुक्यातील सहा ठिकाणी रिक्तपदे

October 21, 2026
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

October 20, 2026
ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

October 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page