• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 21, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, 21 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पोलीस हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यावेळी पुष्पचक्र वाहून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

विविध देशांच्या दूतावासातील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह शहीद पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांची भेट घेऊन त्यांना अभिवादन केले. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमाचे संयोजन केले.

ज्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेपोटी स्वतःचे प्राण अर्पण केले त्या शूर शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी दि २१ ऑक्टोबर रोजी स्मृती संचलन केले जाते. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्य तसेच अर्ध सैनिक दलातील शहीद झालेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी या पोलीस स्मृतिदिन संचलनाचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा: संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavismarathi newspolice commemoration daypolice martyrssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

चोपडा शहर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातच्या अट्टल गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या

October 21, 2026
जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून खत खरेदी-विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) प्रणाली कार्यान्वित होणार; शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता जाणून घेता येणार

October 21, 2026
कोतवाल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; पाचोरा तालुक्यातील आठ, तर भडगाव तालुक्यातील सहा ठिकाणी रिक्तपदे

कोतवाल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; पाचोरा तालुक्यातील आठ, तर भडगाव तालुक्यातील सहा ठिकाणी रिक्तपदे

October 21, 2026
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

October 20, 2026
ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

October 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page