• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 28, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

मुंबई, 28 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळामुळे पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत एकूण 7,500 कोटी रुपयांची मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष वितरणाच्या प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

304 तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना लाभ –

मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना ही अग्रीम मदत दिली जाणार आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध आहे, त्यांच्या खात्यावर थेट 5 हजार रुपये जमा करण्याचे नियोजन आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची आवश्यक माहिती आणि केवायसी तपासून पात्रतेनुसार मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

कर्जाच्या वसुलीसाठी रक्कम कापण्यास मनाई –

शासकीय मदत खात्यात जमा झाल्यानंतर बँका जुन्या कर्जाच्या थकबाकीपोटी ही रक्कम कापून घेतील, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मदतीची रक्कम कर्जाच्या वसुलीसाठी कापली जाऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे मदतीची संपूर्ण रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या हातात पडणार का, तसेच प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: aidcm devendra fadnavisdiwali 2026drought-affected farmersfarmer news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

October 28, 2026
VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

VIDEO | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; कर्जाच्या थकबाकीसाठी मदतीची रक्कम न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश

October 28, 2026
Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

Chopda News: चोपड्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

October 28, 2026
किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

October 27, 2026
दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 27, 2026
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page