चोपडा, 28 ऑक्टोबर: चोपडा शहरात अनैतिक व्यापाराविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. चोपडा-धनवाडी रस्त्यालगत धनवाडी शिवारातील एका पत्री शेडच्या गोदामात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर चोपडा शहर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी जगन्नाथ जानकीराम महाजन (वय ५६, रा. पाटील गढी, चोपडा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
पोलीस निरीक्षक पवन देसले यांना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४५ वाजता गुप्त माहिती मिळाली. धनवाडी शिवारातील शेत गट क्रमांक १२५ मधील पत्री शेडच्या गोदामात संबंधित व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका ४५ वर्षीय महिलेकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. 0या कारवाईत पोलिसांनी एकूण ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात २७ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या






