• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 30, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी 

जळगाव, 30 ऑक्टोबर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सध्या अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. ई-केवायसी पुन्हा कधी सुरू होणार, महा-आयडी कार्ड काढल्याने योजनेचा लाभ सुरू होईल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ई-केवायसीसाठी शासनाकडून सध्या कोणतेही नवीन आदेश आलेले नसल्याचे स्पष्ट करत, सोशल मीडियावरील अफवा आणि पैसे घेऊन ई-केवायसी करून देण्याच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन काळे यांनी केलंय.

ऋषिकेश काळे यांनी दिली महत्वाची माहिती –

ऋषिकेश काळे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती; मात्र त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या, अशा महिलांना त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत आवश्यक दुरुस्ती केलेल्या महिलांचे लाभ पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, ज्यांनी ई-केवायसी प्रक्रियेत सहभागच नोंदवला नाही, अशा महिलांचे पैसे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, सध्या ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत शासनस्तरावरून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

बनावट वेबसाइटपासून सावध राहा –

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली काही ठिकाणी बनावट वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. या वेबसाइटच्या माध्यमातून महिलांकडून २०० ते ४०० रुपये घेतले जात असून, ई-केवायसी झाल्याचा भास निर्माण केला जात आहे. त्यामुळे अशा वेबसाइट किंवा सोशल मीडियावरील खात्यांवर विश्वास ठेवू नये. ई-केवायसीच्या नावाखाली कोणालाही पैसे देण्यापूर्वी अधिकृत माहितीची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी केले.

महा-आयडी कार्ड काढल्याने लाभ सुरू होणार नाही –

महा-आयडी कार्ड काढल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू होईल, असा समजही चुकीचा असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. महा-आयडी कार्ड काढल्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल किंवा बंद झालेला लाभ पुन्हा मिळेल, अशी कोणतीही योजना अथवा तरतूद नसून त्यामुळे महिलांनी अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.

लाभ बंद झाल्याचे कारण जाणून घेण्यासाठी संपर्क साधा –

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या कारणामुळे बंद झाला आहे, याची माहिती घेण्यासाठी महिलांनी जळगाव जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी किंवा तालुकास्तरावरील संबंधित अभय केंद्रांशी संपर्क साधावा. जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी ०२५७-२२२८८२८ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास लाभ बंद होण्यामागील कारण जाणून घेण्यास मदत होईल, असे काळे यांनी सांगितले.

योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती आणि नवीन अपडेट महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने ‘WCD Jalgaon’ या नावाने अधिकृत इन्स्टाग्राम चॅनेलही सुरू केले आहे. योजनेबाबतची माहिती मिळवण्यासाठी महिलांनी या चॅनेलशी जोडले जावे, असे आवाहनही काळे यांनी केले आहे.

हेही वाचा: “वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district women and child development officerjalgaon newsladki bahin yojanamarathi newsrushikesh kalesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page