• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 4 नोव्हेंबर: पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर अचानक तोंडी सूचनेवरून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्टॅम्प वेंडर, चहा विक्रेते, झेरॉक्स व्यावसायिक यांच्यासह अनेक लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन अशोक सोमवंशी यांनी केला आहे.

संबंधित छोट्या व्यावसायिकांना तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम नेमक्या कोणाच्या आदेशाने आणि कोणाच्या सांगण्यावरून राबविण्यात आली, असा सवालही सोमवंशी यांनी उपस्थित केला आहे.

पाचोरा नगरपरिषदेच्या स्वमालकीची नसलेल्या जागांवरही अतिक्रमणाचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आधीच रोजगार हिरावल्यामुळे शेकडो कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना तातडीने पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये जमा करा –

याच निवेदनातून शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारकडून तसेच तहसीलदारांकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याचे सोमवंशी यांनी म्हटले आहे.

शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असताना दिवाळीच्या सणासाठी जाहीर केलेली मदत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, तर भिकमांगो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सचिन सोमवंशी यांनी प्रशासनाला दिला आहे.

यांची होती उपस्थिती –

यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते हरी पाटील, काँग्रेसचे इरफान मणियार, शरीफ शेख, फकीरा पाटील, ईश्वर पाटील, शंकर सोनवणे, सय्यद लाल, शिवराम पाटील, सुनील पाटील, राहुल शिंदे, वाल्मिक पाटील, गफ्फार शेख, श्री. बाविस्कर, प्रशांत धुमाळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: “राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: encroachmentfarmerspachora congresspachora newsrehabilitatesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

November 4, 2026
अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

November 4, 2026
“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

November 4, 2026
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

November 3, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

November 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page