• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

हायमास्ट उभारला, मात्र स्मशानभूमीत पुरेशा प्रकाशाचा अभाव; ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

लासगाव (पाचोरा), 4 नोव्हेंबर: गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील लासगाव येथून समोर आली आहे. गावातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचे काल दुपारी निधन झाले. त्यांच्यावर रात्री 9 वाजता गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पुरेसा प्रकाश उपलब्ध नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना ट्रॅक्टरच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

विशेष म्हणजे, स्मशानभूमीत हायमॅस्ट लॅम्पची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या हायमॅस्टचा प्रकाश अंत्यसंस्कारासाठी पुरेसा पडत नसल्याने दोन्ही बाजूंना ट्रॅक्टर उभे करून त्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडावे लागले. एकीकडे स्मशानभूमीत हायमॅस्ट लॅम्प बसविलेला असताना दुसरीकडे प्रकाशासाठी ट्रॅक्टरच्या उजेडाचा आधार घ्यावा लागणे, ही बाब ग्रामपंचायतीच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

हायमॅस्ट बसविला, पण पूरक प्रकाश व्यवस्थेचे काय? –

स्मशानभूमीत हायमॅस्ट लॅम्प बसविणे ही निश्चितच चांगली बाब आहे. मात्र, केवळ एक हायमॅस्ट बसवून प्रकाश व्यवस्थेची जबाबदारी पूर्ण होत नाही. स्मशानभूमीचा परिसर, अंत्यसंस्काराची जागा आणि नागरिकांच्या ये-जा करण्याचा मार्ग या सर्व ठिकाणी पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. त्यासाठी हायमॅस्टला पूरक म्हणून अतिरिक्त विद्युत खांब, एलईडी दिवे किंवा फ्लडलाईट बसविण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने करणे अपेक्षित होते.

मात्र, प्रत्यक्षात अंत्यसंस्काराच्या वेळी दोन्ही बाजूंना ट्रॅक्टर लावून प्रकाशाची व्यवस्था करावी लागल्याने ग्रामपंचायतीने या मूलभूत सुविधेकडे किती गांभीर्याने लक्ष दिले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लासगाव ग्रामपंचायतीने आता तरी या घटनेतून धडा घेत स्मशानभूमीत हायमॅस्टला पूरक म्हणून अतिरिक्त विद्युत खांब व पुरेशा क्षमतेचे दिवे बसविण्याचे नियोजन करावे. जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अंत्यसंस्कारासारख्या दुःखद प्रसंगी प्रकाश व्यवस्थेसाठी ट्रॅक्टरच्या उजेडाचा आधार घेण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

“ग्रामपंचायतीला विकासकामे करताना अशा मूलभूत सुविधांचा विचार करता येत नसेल, तर यापेक्षा दुर्दैव काय? स्मशानभूमीत पुरेसा प्रकाश मिळावा, यासाठी अतिरिक्त दिवे आणि विद्युत खांब बसविणे आवश्यक होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.”

–         आनंदा सिताराम पैठणकर (माजी सदस्य, ग्रामपंचायत लासगाव)

 

स्मशानभूमीतील अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

“स्मशानभूमीत पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक प्रयत्न केले जातील. यासंदर्भात वायरमनशी चर्चा झाली असून, उद्याच स्मशानभूमीत अतिरिक्त दिवे लावण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच, स्मशानभूमीत आणखी एक हायमॅस्ट लॅम्प बसविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येईल. यासोबतच आगामी काळात सौरऊर्जेवर आधारित छोटे युनिट बसविण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.”

–         प्रशांत पाटील (ग्रामपंचायत अधिकारी, लासगाव)

हेही वाचा: अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: funerallasgoan grampanchayatlasgoan newspachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

November 4, 2026
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ

November 4, 2026
अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

अतिक्रमणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये द्या, पाचोऱ्यात काँग्रेसची मागणी

November 4, 2026
“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

“राजकीय दबावातून आणि ‘अदृश्य शक्तींच्या’ सांगण्यावरून माझा अर्ज बाद केला” – सुमित पाटील

November 4, 2026
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

November 3, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page