• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

पाचोरा, 13 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर आली असून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा छाननीदरम्यान बाद झालेला उमेदवारी अर्ज नाशिक येथील विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी अपिलात वैध ठरवला आहे. या निर्णयामुळे सुमित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंतची नेमकी घडामोड काय? –

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक कारणास्तव प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था व संयुक्त शेती सहकारी संस्था, पाचोरा तालुका मतदारसंघातून सुमित पाटील यांचे नामनिर्देशन अर्ज नामंजूर केले होते. या निर्णयाविरोधात सुमित पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले होते. यावर सुनावणी होऊन सहनिबंधकांनी सुमित पाटील यांचे चारही अपील अर्ज मंजूर करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा पूर्वीचा आदेश रद्द केला आहे.

सहनिबंधकांनी पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघाच्या वैध उमेदवारांच्या यादीत सुमित पाटील यांचे नाव समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातील निवडणुकीत उतरलेल्या सुमित पाटील यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे पाचोरा मतदारसंघात भाजप उमेदवार सतीश शिंदे यांच्या बिनविरोध निवडीच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.

अपिलात अर्ज वैध ठरताच पाचोऱ्यात जल्लोष –

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सुमित पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून बाद करण्यात आल्यानंतर नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते. दरम्यान, नाशिक विभागीय सहनिबंधक नेमकं काय निर्णय देतात याकडे कार्यकर्त्यांसह मतदारसंघाचे लक्ष लागले होते. अशातच सुमित पाटील यांचा छाननीदरम्यान बाद झालेला उमेदवारी अर्ज नाशिक येथील विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी अपिलात वैध ठरविल्याची बातमी समोर येताच पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजीसह जल्लोष केला.

राजकीय समीकरणे अन् महायुतीतील पेच कायम –

सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांचा मार्ग सुकर मानला जात होता. मात्र, आता अर्ज वैध ठरल्याने पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर  दुसरीकडे, जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री उशिरापर्यंत बैठका होऊनही २ ते ३ मतदारसंघांवरून मतभेद कायम असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महायुतीचे नेते यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीचे पुढील महत्त्वाचे टप्पे:

  • अर्ज माघारीची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर २०२६ (१६ आणि १७ नोव्हेंबरला माघारीसाठी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे).
  • मतदान: २९ नोव्हेंबर २०२६.
  • मतमोजणी: ३० नोव्हेंबर २०२६

हेही वाचा: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम

बातमी शेअर करा !
Share
Tags: jdcc bank election 2026joint registrarmarathi newsmla kishor appa patilnomination paper validsumit patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

November 13, 2026
हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 13, 2026
NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

November 13, 2026
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम

November 12, 2026
‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

November 11, 2026
जिल्हा बँक निवडणूक: ‘अधिकार नसताना अर्ज बाद कसा केला?’; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सवाल

जिल्हा बँक निवडणूक: ‘अधिकार नसताना अर्ज बाद कसा केला?’; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सवाल

November 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page