• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कवडक येथील कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 13, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 13 नोव्हेंबर: हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नवाचार आणि नावीन्यता गरजेची आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान, हवामानाचा ताण सहन करणारी पिके आणि आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. उत्तम कृषी महाविद्यालयाची निर्मिती होणेही आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

रामटेक तालुक्यातील कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॅा. पंकज भोयर, शालीनीताई मेघे, आ. समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबीय, शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, यंदा अल निनोचा प्रभाव आणि पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका पिकांना बसला. त्यामुळे हवामानाचा ताण सहन करणारी आणि कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग झाला पाहिजे. कृषी क्षेत्रात वैज्ञानिक संशोधन आणि त्याच्या उपयोजनाची सर्वाधिक आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

शेतीसोबतच पशुपालन हा शेतक-यांसाठी महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्वाचे आहे. देशी गाई केवळ दूध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन, पशुधनासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून रामटेकमध्ये उभारण्यात आलेली हे दोन्ही शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरतील. रामटेकच्या विकासासाठी या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहरू बालसदनच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. सागर मेघे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आ. समीर मेघे यांनी आभार मानले.

जगाला विकासाचा नवा मार्ग दाखवायला हवा – सरसंघचालक डॅा. मोहन भागवत

निसर्गासह आपण सारे एकाच विश्वाचे घटक आहोत, त्याचे मालक नाही. या अर्थाने आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. परिणामी, केवळ माझे नाही, तर सर्वांचे जीवन अशीच आपली जीवनदृष्टी असायला हवी. त्यासाठी माणसाने स्वतःच्या जीवनावर काही संयम राखायला हवेत आणि आजच्या जगाला विकासाचा नवा मार्ग दाखवायला हवा. संपूर्ण विश्व आज त्या दृष्टीने भारताकडे पाहत आहे. आपल्या विकासातून जगाचा विकास झाला पाहिजे, असा विचार प्रत्येक राष्ट्राने करायला हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भात दुग्धव्यवसायाच्या विकासाला मोठी संधी असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात दुग्धव्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू असून एक हजार कोटींचा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. कोल्हापूरच्या तुलनेत संपूर्ण विदर्भातील दूध उत्पादन कमी असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि पशुसंवर्धन हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत ठरू शकतात, असे नमूद केले. शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपालकांना आधुनिक उपचार व तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध होईल. स्व. दत्ता मेघे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असून, रामटेकमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न मेघे कुटुंबियांनी पूर्णत्वास नेल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

 कृषी महाविद्यालयामुळे भविष्यात प्रगतीचे नवे दालन खुले होणार – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

स्व. दत्ताभाऊ मेघे यांनी नागपूर, वर्धा येथे शैक्षणिक संस्था उभारून हजारो डॉक्टर आणि इंजिनिअर घडवले आहेत. आता तंत्रज्ञानासोबतच कृषी आणि पशुधनाच्या क्षेत्रात मेघे कुटुंबाने पाऊल टाकले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सागर आणि समीर मेघे हे दत्ताभाऊंचे रामटेक विकासाचे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील, मेघे कुटुंबाचे हे कार्य रामटेकवासीय विसरू शकणार नाहीत, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

बातमी शेअर करा !
Share
Tags: climate changecm devendra fadnavismarathi newsmodern agricultural researchsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 13, 2026
NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

NQAS प्रमाणनात जळगाव जिल्ह्याची दमदार कामगिरी; 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 125 उपकेंद्रांना राज्यस्तरीय प्रमाणन

November 13, 2026
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम

November 12, 2026
‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

November 11, 2026
जिल्हा बँक निवडणूक: ‘अधिकार नसताना अर्ज बाद कसा केला?’; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सवाल

जिल्हा बँक निवडणूक: ‘अधिकार नसताना अर्ज बाद कसा केला?’; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सवाल

November 10, 2026
Pachora News: आजारी मुलाच्या उपचारासाठी राहुल बेहरे यांचा मदतीचा हात; निराधार माय-लेकाला आर्थिक मदत

Pachora News: आजारी मुलाच्या उपचारासाठी राहुल बेहरे यांचा मदतीचा हात; निराधार माय-लेकाला आर्थिक मदत

November 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page