आडगाव (ता. एरंडोल), 14 नोव्हेंबर: वैचारीक स्वराज्य (आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ – महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व २०२६’ अंतर्गत ‘वेध वार्षिकांक २०२६-२७’ चे प्रकाशन आणि खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील राधाकृष्ण मंदिर देवस्थानमध्ये रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती –
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारताचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे हे राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते ‘वेध’ वार्षिकांकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील उपस्थित राहणार असून, संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्कर महाराज गोसावी (पैठण) यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
तसेच, या सोहळ्याला माजी पालकमंत्री सतिष आण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, नंदुरबार-रावेर शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे सर, कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि कायदेतज्ज्ञ व नार-पार प्रकल्प अभ्यासक ॲड. विश्वासराव भोसले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
‘खान्देश कर्तृत्त्वपर्व २०२६’ पुरस्कारार्थी –
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील मान्यवरांना आणि संस्थेला गौरविण्यात येणार आहे:
- जीवन गौरव पुरस्कार: ह.भ.प. श्री. भानुदास गुरु माहुजी बुवा (मठाधिपती, आडगाव, ता.एरंडोल) व प्रा. श्री. सुनिल बाबुराव पाटील (सेवानिवृत्त प्राचार्य, न्यु इंग्लिश स्कुल भडगाव)
- लोकशिक्षक पुरस्कार: श्री. दिलीप खोपडे सर (माजी जिल्हा परिषद, जळगाव)
- खान्देशचा बळीराजा पुरस्कार: श्री. विनायक महादू पाटील (कोठली, ता. भडगाव)
- खान्देशची रणरागिणी पुरस्कार: सौ. लिलाताई सुरेश चौधरी (नगराध्यक्षा, धरणगाव)
- शब्दसाधना पुरस्कार: श्री. संजय छबेराव हिरे (खेडगाव, ता. भडगाव)
- समाजभूषण पुरस्कार: श्री. भागवत भिकन पाटील (उत्राण, ता. एरंडोल) व श्री. भैय्यासाहेब पुंडलिक पाटील (गुढे, ता. भडगाव)
- ज्ञानदीप लावू जगी पुरस्कार: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, होळ (ता. पाचोरा)
- लोकसेवक पुरस्कार: श्री. अमृत प्रभाकरराव देशमुख (पोलीस पाटील, फरकांडे ता. एरंडोल)

आयोजक व सहकार्य –
वैचारीक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. दिनेश महाराज पाटील (फरकांडे) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी संत माहुजी महाराज संस्थान, आडगाव, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ (आडगाव) आणि खान्देशचा सरपंच वृत्तसेवा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन






