ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 सप्टेंबर : पाचोरा तालुक्याती वाडी शेवाळे येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. वंचितचे जळगाव जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शन व जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार होते. सदर कार्यक्रम तालुकाध्यक्ष पाचोरा विशाल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी व पाचोरा तालुका प्रसिध्दीप्रमुख आकाश पवार व कार्यकारणीतील पदाधिकारी तसेच भावी महिला आघाडी अध्यक्ष सिरीन पठाण यांनी मेहनत घेऊन 30-35 महिला व 100-125 पुरुष मंडळी मिळुन कार्यक्रम घडवून आणला. सदर कार्यक्रमाला अनमोल सहकार्य माजी सरपंच भिकन तडवी शेवाळे येथील यांचे लाभले.
अॅड. रविकांत वाघ यांनी नवनिर्वाचितांना शाखाध्यक्ष गुलाब तडवी, उपाध्यक्ष एकनाथ निकम, मुकुंद तडवी सचिव ,किरण साठे खजिनदार तर रविंद्र वाघ सल्लागार यांच्या समवेत सर्व नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले . आणि आलेल्या मान्यवरांचे व महिलांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी सातगाव डोंगरी येथील शाखाध्यक्ष शेख मुस्ताक व एजाज भाई, सावखेडा गावाचे सरपंच व शाखा अध्यक्ष राजेश सोनवने व कार्यकर्ते तसेच वरखेडी & भोकरी येथून सुनिल भाऊ दांडगे व शेख चिराग भाई,लासुरे येथिल कार्यकर्ते, पाचोरा येथील दिपक सोनवणे, एजाज पिंजारी आणि सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आणि शेवाळे गावातील सरपंच-उपसरपंच आणि सर्व सदस्य व गावातील कार्यकर्ते तथा नागरिक उपस्थित होते .