• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त होणार; कायद्याचे उल्लंघन केले तर होईल ‘ही’ कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 4, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त होणार; कायद्याचे उल्लंघन केले तर होईल ‘ही’ कारवाई

जळगाव, 4 ऑक्टोंबर : सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना सापडल्यास त्याला 200 रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना –
राज्याच्या आरोग्य विभागाने 10 जुलै 2023 रोजी शासन निर्णय जाहीर केला असून प्रत्येक शासकीय विभागाने सूचनाचे बोर्ड कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

धूम्रपानामुळे गंभीर आजार –
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, धुम्रपानामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. असंसर्गजन्य रोगामधील कर्करोग, हदयविकार, मानवी हृदयाशी निगडित रोग, फुफुसांचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होतात. भारतामध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमध्ये 8 ते 9 लाख मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे होत असतात.

अंमलबजावणीस सुरूवात –
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यामुळे आणि थुंकल्यामुळे त्यामधून स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग, निमोनिया आणि पोटांचे विकार आदी संसर्गजन्य आजार पसरतात. जन सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आणि शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छ भारत स्वस्थ्य भारत या मोहिमेद्वारे शासकीय इमारतीची साफसफाई करून शासकीय कार्यालये व परिसर हा तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला असून त्यांची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

याठिकाणी असेल प्रतिबंध –
सार्वजनिक ठिकाणी ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाची जागा, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये यांचा समावेश होत असून तेथे नागरिकांच्या संरक्षणाकरता सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य इतर उत्पादने प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने खाण्यास थुंकण्यास धुम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जबाबदार व्यक्तींची नेमणूक –
शासकीय इमारतीच्या परिसरामध्ये धुम्रपान करणे आणि थुंकणाऱ्यावर दंडात्मक गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा दंडूका उगारण्यात येणार आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी खासगी कार्यालये, उपहारगृहे, शाळा व महाविद्यालये परिसरात जबाबदार व्यक्तींची नेमणूक करावी.

तालुकास्तरावर समिती –
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समिती तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, प्राचार्य, स्थानिक तरूण मंडळ, सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वावर पेटी –
शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेट जमा करण्यासाठी पेटी ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक मजल्यावर, लिफ्ट आदी ठिकाणी तंबाखू तसेच तंबाखू पदार्थामुळे होणाऱ्या हानीबाबतचे फलक लावले जाणार आहेत. या फलकावरच सिगारेट अथवा तंबाखू विरोधी मोहिमेच्या अधिकाऱ्यांचे नाव नंबर दिले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून सरकारी कार्यालयामध्ये सिगारेट अथवा तंबाखूजन्य उत्पादने वापरल्यास 200 रूपयांचा दंड आकारला जाणार आहे,असे ही आयुष प्रसाद यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadsmokingतंबाखूमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

April 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page