• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वीर जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 19, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धरणगाव
वीर जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव, 19 नोव्हेंबर : अमर रहे…, अमर रहे… वीर जवान विनोद पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी रोटवद, ता.धरणगाव येथे वीर जवान विनोद शिंदे – पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान विनोद पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.

शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार –
भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील (वय 39) यांचा शनिवारी, 18 नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, शहीद जवानाची वार्ता रोटवदला धडकताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी रोटवद, ता. धरणगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान विनोद पाटील अमर रहे’ सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

यांची होती उपस्थिती –
वीर जवान विनोद पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, एरंडोल प्रांताधिकारी मनिष गायकवाड, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जिबाऊ पाटील, रोटवद सरपंच सुदर्शन पाटील, पोलीस पाटील नरेंद्र शिंदे यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा आदित्य यांनी मुखाग्नी दिला.

शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदतीची पालकमंत्र्यांची ग्वाही –
पालकमंत्री गुलाबराव पाटील श्रद्धांजली वाहतांना म्हणाले की, आपल्या तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनोद पाटील यांच्या कुटुंबीयांस महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी वीर जवान पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

May 24, 2026
“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

May 23, 2026
“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

May 23, 2026
Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

May 22, 2026
राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

May 22, 2026
सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

May 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page