• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Nashik Crime : प्रेयसी दुसऱ्याशी चॅटिंग करत असल्याचा आला संशय; संतप्त प्रियकराने केले धक्कादायक कृत्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
File Photo

File Photo

नाशिक, 25 जानेवारी : राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये मंगळवारी (23 जानेवारी) रासबिहारी लिंक रोड येथे एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरास अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या प्रियंका वीरजी वसावे (19, रा. ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) तरूणीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोडवरील एका मोकळ्या जागेत मंगळवारी आढळून आला होता. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तरूणीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले होते. याप्रकरणी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता.

चॅटिंग करीत असल्याचा आला संशय –
मृत तरूणी छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका परिचारिका महाविद्यालयात परिचारिकेचे शिक्षण घेत होती. ती मुलगी आणि याप्रकरणातील आरोपी सागर तडवी यांची जुनी मैत्री होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले अन् तरूणी अंबड येथे राहत असलेल्या सागरच्या घरी गेली. दरम्यान, रात्री एक ते दीडच्या सुमारास ती दुसऱ्या कोणाशी मोबाईल फोनवर चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला आणि याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले.
प्रियंका वीरजी वसावे (19, रा. ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार)

प्रेयसीचा आवळला गळा –
दरम्यान, प्रेयसी फोनवर चॅटिंग करीत असल्याचा संशय आल्याने संतप्त प्रियकराने तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. दरम्यान, प्रियसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून चारचाकीतून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकला होता.

आरोपीला पोलिसांनी केली अटक –
पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित प्रियकरास शिताफीने बेड्या ठोकल्या असून सागर तडवी (21, मूळ रा. नंदुरबार, हल्ली राहणार, माऊलीनगर, अंबड, नाशिक) असे संशयित प्रियकराचे नाव आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सपोनि मिथुन परदेशी, रोहित केदार, हवालदार सागर कुलकर्णी, राजेश सोळसे, अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, पोलीस नाईक नीलेश भोईर, संदीप मालसाने, घनश्‍याम महाले, वैभव परदेशी, नितीन पवार, गोरख साबळे, श्रीकांत साळवे यांनी संयुक्तिकरीत्या केली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsnashik crimenashik police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page