मुंबई, 8 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटांत जोरदार टीका असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहणी खडसे यांनी देखील जोरदार टीका केली. जन्मदात्या बापाचे नाव लावणे अपेक्षित असताना राजकारणात मात्र, बाप बदलण्याची नवीन पद्धत आल्याची टीका खडसे यांनी केली.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे? –
शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, खरे पाहिले तर असा निकाल येणे अपेक्षित होते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष वाढवला, त्या पक्षाचे चिन्ह काढण्यात आले. त्यामुळे हे माहीत होते की, आपल्या पक्षाचेही चिन्ह काढण्यात येईल. या निकालामुळे लोकशाही आता महाराष्ट्रात तसेच भारतात शिल्लक राहिलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार हे आमची एकमेव ताकद व पक्ष आहे. पवार साहेब आमच्या सोबत असल्याने, लढेंगे भी और जितेंगे भी, असा नारा रोहिणी खडसे यांनी दिलाय.
बाप बदलण्याची ही नवीन पद्धत –
सुप्रिया सुळे यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या या सर्व निर्णयात अदृश्य शक्ती आहेच. मात्र, देशभरात जनतेमध्ये जो संतोष निर्माण झाला आहे तो मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार आहे. जन्म देणाऱ्या बापाचे नाव लागले पाहिजे, जन्म देणाऱ्या बापाचाच हा पक्ष असायला हवा. मात्र, बाप बदलण्याची ही नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे, अशी जोरदार टीका रोहिणी खडसे यांनी केली.
हेही वाचा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, शरद पवार गटाला मिळाले नवीन नाव –