ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 14 फेब्रुवारी : सातगाव डोंगरी येथील श्री. साई समर्थ कृपा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रथम स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक भैयासाहेब पाटील, संचालिका सुवर्णा पाटील तसेच स्थानिक चेअरमन राजू बोरसे यांच्यासह गावातील सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. साई समर्थ कृपा माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनाला साई सप्तरंजन असे नाव देण्यात आले होते. या साई सप्तरंजन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला. यावेळी अनेक गाण्यांवर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले नृत्य कलेचे दर्शन प्रेक्षकांसमोर ठेवले. तर काही सामाजिक उद्बोधनासाठी तयार केलेल्या नाटिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध कलागुणांनी विद्यार्थ्यांनी सातगाव ग्रामस्थांचे मने जिंकून घेतली.
यावेळी सातगाव व परिसरातील पालक व ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांना बक्षिस दिले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या सर्व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनी अवांतर गोष्टींपेक्षा शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्याचे आवाहन केले. मुलींच्या शिक्षणासाठी बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेवर त्यांनी भर दिला. तसेच अभ्यासाच्या वेळेस अभ्यास केले पाहिजे आणि शिकाल तरच मोठे व्हाल, असेही भैय्यासाहेब यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा पाटील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर सोनवणे, रवींद्र भदाने, सतीश लोहार, पंकज अहिरे यांनी सांभाळले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका नर्मदा पांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल जाधव, नितीन पाटील, कुलदीप सर, धीरेंद्र पाटील, दिनेश परदेशी, चेतन पाटील, निकिता राजपूत, ज्ञानेश्वर खैरनार, निलेश महाजन, दीपक पाटील, सतीश पाटील, किरण परदेशी यांनी मेहनत घेतली. संस्थेतील मुकेश खंडागळे, समाधान पाटील, सुधाकर सोनवणे व संस्थेतील इतर सहकारी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
हेही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावली