ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी, 28 फेब्रुवारी : सातगाव डोंगरी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन काल (27 फेब्रुवारी) उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमांच्या सुरवातीला उपस्थित शालेय समितीचे अध्यक्ष अशोक मानखा तडवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरस्वती माता, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला यावेळी अनेक गाण्यांवर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले नृत्य कलेचे दर्शन प्रेक्षकांसमोर ठेवले तर काही सामाजिक उद्बोधनासाठी तयार केलेल्या नाटिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध कलागुणांनी विद्यार्थ्यांनी सातगाव ग्रामस्थांचे मने जिंकून घेतली.
यावेळी उपस्थित रसिकांनी दाद देताना टाळ्या वाजवून वन्स मोअर यांनी कार्यक्रम रंगत गेला. रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सातगाव व परिसरातील पालक व ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करून कौतुकाची थाप दिली. ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश कदम यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा शाळेतील प्राचार्य जितेंद्र पाटील, शरद कोलगे, राजेंद्र विसपुते, नितीन साळुंखे, श्रीराम वानखेडे, सुरेश कदम, विनोद महालपुरे, रमेश पाटील, समाधान गोळाईन, नंद किशोर कदम, साधना तायडे, जयश्री निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शालेय समितीचे अध्यक्ष अशोक मानखा तडवी, भरत पाटील, भिला पवार, प्रकाश सकट, अशोक वाघ, तसेच गावातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील, ज्ञानेश्वर अहिरे, शंकर पवार, देविदास वाघ, गोकुळ वाघ, तानाजी पाटील तसेच गावातील सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हेही वाचा : आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे अमोल शिंदे व शरद पवार गट समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश