• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

मोठी बातमी! पारोळा तालुक्यातील टोलनाक्याची तोडफोड करत अज्ञातांनी कॅबिन पेटवली, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 11, 2024
in पारोळा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मोठी बातमी! पारोळा तालुक्यातील टोलनाक्याची तोडफोड करत अज्ञातांनी कॅबिन पेटवली, नेमकं काय प्रकरण?

संदिप पाटील/सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 11 मार्च : राष्ट्रीय महामार्गावर सबगव्हाण गावाजवळ असलेला टोलनाका आजपासून सुरू होण्यापुर्वीच या टोल नाक्यावर आज पहाटे कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून देतानाच तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या घटनेने पारोळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या महामार्गावर तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे. दरम्यान, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या अज्ञात टोळक्याने कॅबिनमध्ये पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून दिली. यानंतर त्यांनी दुसऱ्या कॅबिनसह अन्य भागांची तोडफोड करत पलायन केले.

टोलनाक्याचे मोठे नुकसान –
अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झालेला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. सदर घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी टोल नाक्याची पाहणी केली. दरम्यान, याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोलनाक्याविरोधात वाहनधारकांच्या प्रतिक्रिया –
तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे. आज या टोलनाक्याचे उद्घाटन होणार होते. या पार्श्वभूमीवर वाहनधारकांच्या टोल नाक्याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या. पाळधी ते तरसोद बायपाससह या मार्गावरील अनेक भागांचे काम बाकी असतांना हा टोल नाका सुरू करणे चुकीचे आहे तसेच टोलचे दर हे सर्वसामान्य वाहनधारकांना परवडणारे नसल्याचे वाहनधारकांच्या प्रतिक्रिया आहेत.

हेही वाचा : Breaking : 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार, पारोळा तालुक्यातील पिंपरी येथील खळबळजनक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola latest newsparola newsparola tolnaka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

वाहतूक कोंडीनं काल महिला संतापली अन् मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “पुढील काळात अशा प्रकारची……..”

April 22, 2026
‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 22, 2026
महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

महिला व बाल विकास विभागाच्या ‘स्पेशल फोर्स’ची बालविवाह रोखण्यात राज्यव्यापी धडक कारवाई

April 22, 2026
VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

VIDEO | जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CEO मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान

April 22, 2026
VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

VIDEO | श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून स्वीकारला पदभार

April 21, 2026
पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला 25 वर्ष पुर्ण; संस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोऱ्यातील संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला 25 वर्ष पुर्ण; संस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार किशोर आप्पा पाटील

April 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page