चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 6 एप्रिल : राज्याचे माजी मंत्री आणि सध्या शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात राहणार की त्याही भाजपात जाणार असा संभ्रम निर्माण झाला असताना रोहिणी खडसे यांनी स्वतः याबाबत त्यांची भूमिका स्पष्ठ केली आहे.
रोहिणी खडसे यांनी केली भूमिका स्पष्ठ –
एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर रोहिणी खडसे यांनी ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ठ केली. “मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …लढ़ेंगे और जीतेंगे,” अशी भूमिका रोहिणी खडसे यांनी त्यांच्या ट्विटद्वारे स्पष्ठ केली.
कोण आहेत रोहिणी खडसे? –
रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून त्यांनी एलएलबी आणि त्यानंतर एलएलएम केले आहे. रोहिणी यांनी भाजपच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, शिंवसेना आमदार यांनी चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला.
यानंतर रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्यासह संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटात राहणे पसंत केले. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा : Breaking : मोठी बातमी! जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप, एकनाथ खडसे भाजपात जाणार?