• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 10, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, चाळीसगाव, ताज्या बातम्या
VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

चाळीसगाव, 10 मार्च: बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा उकळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी, चार पोलीस कर्मचारी आणि इतर संशयितांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओझरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार कळंबेकर, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन निकम, रवींद्र बत्तीसे तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र पाटील आणि सुनील निकम, मृत व्यक्तीची पत्नी अरुणा जाधव आणि भाऊ मिथून जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रेम पाटील तसेच प्रविण पाटील यांचा समावेश असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील राजेंद्र जालंदर जाधव यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्यावर अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. कारने धडक दिल्याने त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले होते.

दरम्यान, मृताचे वारसदार म्हणून पत्नी अरुणा जाधव यांनी ३ मे २०२५ रोजी खासगी इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाखांच्या विम्याचा दावा दाखल केला. विमा कंपनीने चौकशी केल्यानंतर तपासात राजेंद्र जाधव यांचा मृत्यू प्रत्यक्षात २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातील फोटोवरही हीच मृत्यूची तारीख होती.

या प्रकरणात मृत्यू दाखला आणि अपघात पंचनामा बनावट तयार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विमा कंपनीकडून करण्यात आलेल्या चौकशीत संशय निर्माण झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी सखोल तपास करून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

हेही वाचा: VIDEO | पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon newsfake accidentfake claimjalgaon district crime newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page