सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 19 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, यामध्ये गडचिरोली मतदारसंघाचा देखील समावेश आहे. गडचिरोली हा अतिसंवेदनशील भाग मानला जातो. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारोळा येथून बंदोबस्तासाठी 29 होमगार्ड रवाना झाले.
पारोळ्यातून निवडणूक बंदोबस्तासाठी होमगार्ड रवाना –
जिल्हा समावेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित होमगार्ड मायाराम पाटील (झज) नंदकिशोर राजहंस, रोहित बागुल, अशोक विसपुते, अधिकार पाटील, हिम्म त पाटील, रुपेश पाटील, प्रमोद पाटील, आबा पाटील, किरण पाटील, भरत कोळी, भिकन लोहार, नंदलाल कोळी, योगेश मराठे, जितेंद्र पवार, धोंडू लोंढे, सचिन मोरे, सचिन पाटील, आशिषकुमार पाटील, किरण सोनवणे, जगदीश पाटील, हिरालाल पाटील, अजय जाधव, आशिषकुमार पाटील, छोटू भोई, वासूदेव भोई, लियाकत पठाण, सनी बोरसे यांच्यासह 28 होमगार्ड निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत. सलग 10 दिवस 28 होमगार्ड हे अतिसंवेदनशील गडचिरोली येथे बंदोबस्त ठेवतील.
हेही वाचा : Parola News : कर्जबाजारीपणाला कंटाळून चोरवड येथील शेतकऱ्याची आत्महत्या, काय आहे संपूर्ण बातमी?