मुंबई, 26 एप्रिल : राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. यामध्ये विदर्भातील पाच तर मराठवाड्यातील तीन मतदारसंघाचा समावेश आहे.
कोणत्या मतदारसंघात सुरू आहे मतदान? –
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ- वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. दरम्यान, या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद होईल.
9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी –
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.45 % मतदान झाले आहे. अकोल्यात 7.17%, वर्ध्यात 7.18 % तर अमरावतीमध्ये 6.34% मतदान झाले. परभणीमध्ये सर्वाधिक 9.72% टक्के मतदान झाले.
मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे –
- परभणी – 9.72
- नांदेड – 7.23
- हिंगोली – 7.23
- यवतमाळ-वाशिम – 7.23
- वर्धा – 7.18
- अकोला – 7.17
- अमरावती – 6.34
- बुलढाणा – 6.61