संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 28 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागला आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यातील चोरवड येथील शाळेचा निकाल 95.65 टक्के लागला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा होती. दरम्यान, काल दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पारोळा तालुक्यातील चोरवड येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित, श्री दत्त माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95.65 टक्के लागला आहे. तसेच रोशनी विकास सुतार या विद्यार्थीनीने 93.60 गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे.
दहावीत यश मिळवेले प्रथम पाच विद्यार्थी –
-
प्रथम – रोशनी विकास सुतार 93.60%
-
द्वितीय – मोहिनी राजेंद्र पाटील – 92.00%
-
तृतीय – हेमांगी कैलास पाटील- 91.40%
-
चतुर्थ – साक्षी भगवान पाटील – 89.60%
-
पाचवा – समृद्धी अरुण पाटील – 89.40%
-
मुलांमधून प्रथम – दिशांत भाऊसाहेब देसले – 88.00%
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक पराग मोरे, रोहन मोरे, चोरवड, भोंडण, पोपटनगरचे सरपंच, उपसरपंच व सर्व सन्माननीय पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी दहावीच्या परिक्षेत यश मिळविलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.