• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

गिरणा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 29, 2024
in चाळीसगाव, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
गिरणा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना

चाळीसगाव, 29 मे : चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक घटना घडली आहे. गिरणा नदीत आवर्तनाचे पाणी असल्याने पोहायला गेलेला आठ वर्षांचा बालक पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावात ही घटना घडली. यश राजेंद्र पवार (वय 8) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत एका लहान मुलाला वाचविण्यात यश आले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील गिरणा नदीपात्रात सध्या पाणी आहे. या नदी पात्रात गावातील पाच ते सहा लहान मुले पोहण्यासाठी गेले होते. नदीपात्रात ही मुले गुडघाभर पाण्यात पोहत असताना यश राजेंद्र पवार हा बालक पोहता पोहता थोडा पुढे गेला. दरम्यान, नदीपात्रातील खड्ड्यात गेल्याने पाण्याचा प्रवाहात तो ओढला गेला. त्याचवेळी आणखीन एक मुलगा वाहून जात असताना त्याला दुसऱ्या एका मुलाने धरल्याने तो बचावला.

वरखेडे खुर्द शिवारात सापडला मृतदेह –
यश पवार हा मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. हा प्रकार नदीवर धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलेने पाहिल्यानंतर तिने गावात पळत जाऊन मुलगा नदीत वाहून गेल्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ नदीपात्राकडे धाव घेत मुलाचा शोध घेतला. मात्र, यशचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर वरखेडे खुर्द शिवारात सापडला.

मुलाच्या मृत्यूने आईचा आक्रोश –
गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेला यश पवार हा तिसरीत शिकत होता. यश हा त्याच्या आई- वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. यशचे आई वडील शेतमजूर असून सकाळी ते कामावर जाण्यापूर्वी मुलाला भेटले आणि त्यानंतर अर्ध्या तासात मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, आईला आपल्या बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच तिने एकच हंबरडा फोडत ‘माझा बाळाला आणून द्या हो’ असा आक्रोश केला. दरम्यान, या घटनेने अनेकांचे डोळे पाणावले.

हेही वाचा : धक्कादायक! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण ठार, काय आहे संपुर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: boy died by drowningboy drowning in girna riverchalisgaonchalisgaon latest newsgirna river

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 13, 2026
VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले;  ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 13, 2026
‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

March 13, 2026
Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

March 13, 2026
गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प, पोलीस भरतीवर भर; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प, पोलीस भरतीवर भर; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

March 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page