सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 11 जून : पशुवैद्यकिय दवाखाना शिरसमणी अंतर्गत येणाऱ्या चोरवड येथे लंपी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दवाखान्याला उपलब्ध झालेल्या हिस्टर कंपनीचे लसींचे लसीकरण करण्यात आले. आहे.
शिरसमणी पशुवैद्यकिय दवाखाना अंतर्गत येणारे शिरसमणी येथील लसीकरण झाले असून या क्षेत्रात येणाऱ्या शिरसमणी, टिटवी, टिटवी सिम, सुधाकर नगर, चोरवड, भोंडण, पोपटनगर येथील लसीकरण लसींच्या उपलब्धतेनुसार होणार असल्याची माहिती डॉ. शांताराम पाटील यांनी दिली.
लसीकरण मोहीम पार पाडण्यासाठी डॉ. शांताराम पाटील, खाजगी पशुवैदयक डॉ. आसिफ कुरेशी, दिपक पाटील, शुभम पाटील परिश्रम घेत आहेत.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पंधराच दिवसात घडली दुसरी घटना, इंजिनिअरने ट्रेडिंगच्या नादात गमावले 27 लाख रुपये